🇮🇳 महाराष्ट्र शासन | Government of Maharashtra
05 ऑक्टोबर 2026 | हेल्पलाइन (Helpline)
Maharashtra Emblem

महाराष्ट्र शासन

जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे

कोतवाल पदभरती प्रक्रिया - २०२६
🏛️
अधिकृत भरती पोर्टल
Collector Office Thane

महाराष्ट्र शासन | जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे

कोतवाल संवर्ग पदभरती प्रक्रिया - २०२६

ठाणे जिल्ह्यातील विविध उपविभागांतर्गत रिक्त असलेल्या कोतवाल पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

महत्त्वाच्या सूचना व नवीन घोषणा (Latest Announcements & Notices)

LIVE UPDATES
ताज्या सूचना लोड होत आहेत...

पदाची माहिती व पात्रता निकष (Eligibility & Post Information)

शैक्षणिक अर्हता

उमेदवार किमान इयत्ता ४ थी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे (इयत्ता ४ थी ते ९ वी पर्यंतची गुणपत्रिका किंवा शाळा सोडल्याचा दाखला).

वयोमर्यादा

अर्जदाराचे वय १८ ते ४० वर्षे दरम्यान असावे. शासन निर्णयानुसार आरक्षित संवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयोमर्यादेत सूट राहील.

स्थानिक रहिवासी

उमेदवार ज्या सज्जातील गावासाठी अर्ज करत आहे, त्या संबंधित गावाचा / सज्जाचा स्थानिक रहिवासी असणे अनिवार्य आहे.

शारीरिक सक्षमता

उमेदवार शारीरिकदृष्ट्या सुदृढ व सक्षम असावा, तसेच सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र आवश्यक राहील.

अर्ज भरण्यासाठी मार्गदर्शक सूचना (Important Guidelines)

  • १. अर्ज प्रक्रिया: अर्जदाराने ऑनलाइन अर्जामध्ये सर्व माहिती अचूक व इंग्रजीतून भरणे आवश्यक आहे.
  • २. कागदपत्रे अपलोड: फोटो व स्वाक्षरी JPG/PNG स्वरूपात तर जात प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला व रहिवासी दाखला हे PDF (कमाल २०० KB) स्वरूपात अपलोड करावेत.
  • ३. परीक्षा शुल्क व पेमेंट: ऑनलाइन शुल्क भरल्यानंतर बँक खात्यातून रक्कम वजा झाल्यास किमान २४ तास प्रतीक्षा करावी, तत्काळ दुबार पेमेंट करू नये.
  • ४. अर्जाची प्रत (Reprint): अर्ज यशस्वीरीत्या जमा झाल्यानंतर 'Reprint Application' पर्यायावरून अर्जाची छापील प्रत जपून ठेवावी.
  • ५. प्रवेशपत्र (Admit Card): लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र परीक्षेपूर्वी अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल.
कृपया प्रतीक्षा करा...
कृपया प्रतीक्षा करा...